माझ्याबद्दल

मी निलेश शिवाजी देसाई

जन्म तारीख : १९-०९-१९८८


माझ्याबद्दल सांगण्यासारखं असं विशेष काहीच नाही.

एक व्यक्ती यापलिकडे माझी ओळख नाही. वाचनाची आवड म्हणून आणि वाचता वाचता सहज सुचलं म्हणून लिहीण्याचा थोडाफार प्रयत्न. सुरुवातीला प्रतिलिपी वेबसाईट वर लिहिलेल्या एका कथेला मिळालेल्या प्रतिसादामुळेच अजून लिखाण करावंसं मनात आले.

लहानपणापासून वाचनाचं जबरदस्त वेड. महाभारत, रामायण, शिवचरीत्र, ययाति शाळेत असतानाच वाचले. सुरूवातीपासून हातात भेटत गेले ते पुस्तक अधाश्यासारखे वाचून काढण्याची सवय असल्याने वाचनाचा वेग वाढत गेला. आणि त्यामुळे बरीच पुस्तके वाचता आली. कॉलेजवयात स्वतः लिहावं असं खुपदा मनात आलं, पण जमलं नाही. शेवटी ऑनलाईन पब्लीश प्लॅटफॉर्म भेटला आणि मग तिथं लिहीलेल्या पहील्या कथेने लिखाणाचा हुरूप वाढवला.

मी स्वतः काही लिहीलं असं म्हणण्यापेक्षा वाचकांनी माझ्याकडून ते लिहून घेतलं असं म्हणणं रास्त ठरेल.

वाचकांनी ऑनलाईन अथवा ऑफलाईन दिलेले अभिप्राय, त्यांनी केलेलं कौतुक यामुळेच मी लिहीत गेलो. लेखक हा वाचकांवर अवलंबून असतो. वाचकांच्या मनात उतरू शकलो तर आनंदच आहे. कथा वाचून तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
माझ्याबद्दल माझ्याबद्दल Reviewed by Nilesh Desai on December 13, 2019 Rating: 5

No comments:

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना   हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौक...

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. Theme images by enjoynz. Powered by Blogger.